पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम १५ :
या अधिनियमांचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निदेश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती :
(१) जो कोणी या अधिनियमाच्या उपबंधाचे किंवा त्याखाली केलेल्या नियमांचे किंवा काढलेल्या आदेशांचे किंवा दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात कसूर करील किंवा त्यांचे उल्लंघन करील त्यास, अशा प्रत्येक कसुरीबद्दल किंवा उल्लंघनाबद्दल पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा या दोन्ही शिक्षा देण्यात येतील आणि कसूर किंवा उल्लंघन चालू राहिले तर, अशा पहिल्या कसुरीबद्दल किंवा उल्लंघनाबद्दलच्या दोषसिद्धीनंतर अशी कसूर किंवा उल्लंघन चालू राहिल्याच्या प्रत्येक दिवसागणिक पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या जादा द्रव्यदंडाची शिक्षा दिली जाईल.
(२) पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेली कसूर किंवा उल्लंघन दोषसिद्धीपासून एक वर्षाच्या कालावधीनंतरही चालू राहिले तर, अपराध्यास सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल.