हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम ९ :
नियम करण्याची शक्ती :
१) केंद्र सरकारला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी नियम करता येतील.
१.(२) विशेष करुन आणि पूर्वगामी शक्तींच्या, सर्वसाधारणतेला बाध न येता, अशा नियमांत पुढील गोष्टींसाठी उपबंध करता येतील :-
(a)क)(अ) कलम ३ च्या पोटकलम (२) मध्ये निर्देशिलेल्या भेट वस्तुंची कोणतीही यादी ज्या नमुन्यात व ज्या रीतीने आणि ज्या व्यक्तीकडून ठेवण्यात येईल तो नमुना, ती रीत व त्या व्यक्ती आणि त्याच्यांशी संबंधित अन्य सर्व बाबी ; आणि
(b)ख)(ब) या अधिनियमाच्या अंमलबजावणीसंबंधीचे धोरण व कार्यवाही यांमधील अधिक चांगला समन्वय.)
२.(३) या कलमाखाली केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर एका सत्राने ३.(किंवा लागोपाठच्या दोन किंवा अधिक सत्राने मिळून बनलेल्या अशा एकूण ३० दिवसांच्या कालावधीकरिता संसद सत्रासीन असताना तिच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल आणि ज्या सत्रात तो याप्रमाणे ठेवण्यात आला ते किंवा त्याच्या निकटनंतरचे सत्र संपण्यापूर्वी) जर, त्या नियमात कोणतेही अपरिवर्तन करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले अथवा तो नियम करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले तर, तो नियम त्यानंतर, यथास्थिति, अशा आपरिवर्तित रुपातच परिणामक होईल, किंवा मुळीच परिणामक होणार नाही. तथापि, त्यायोगे अशा कोणत्याही अपरिवर्तनामुळे किंवा शून्यीकरणामुळे त्या नियमाखाली पूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाध येणार नाही.
——-
१. १९८४ चा अधिनियम ६३ याच्या कलम ८ द्वारे पोटकलम (२) (२-१०-१९८५ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९८४ चा अधिनियम ६३ याच्या कलम ८ द्वारे पोटकलम (२) ला पोटकलम (३) (२-१०-१९८५ पासून) असा नवीन क्रमांक देण्यात आला.
३. १९८४ चा अधिनियम २० याच्या कलम २ व अनुसूचीद्वारे विशिष्ट शब्दांसाठी हा मजकूर (१५-३-१९८४ पासून) समाविष्ट करण्यात आला.