हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम ६ :
हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितार्थ असावयाचा :
१) जिचा विवाह असेल तिच्या व्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तीने हुंडा प्राप्त केला असेल तर,-
(a)क)(अ) हुंडा विवाहापूर्वी मिळाला असल्यास, विवाहाच्या दिनांकानंतर १.(तीन महिन्यांच्या) आत, किंवा
(b)ख)(ब) हुंडा विवाहाच्या वेळी किंवा नंतर मिळाला असल्यास, तो मिळाल्याच्या दिनांकानंतर १.(तीन महिन्यांच्या) आत, किंवा
(c)ग) (क)ती स्त्री अज्ञान असताना हुंडा मिळाला असल्यास, ती अठरा वर्षे वयाची झाल्यानंतर १.(तीन महिन्यांच्या) आत,
ती व्यक्ती त्या स्त्रीकडे तो हस्तांतरित करील व असे हस्तांतरण होईपावेतो त्या स्त्रीच्या हितार्थ न्याय म्हणून धारण करील.
२.(२) जर कोणतीही व्यक्ती पोटकलम (१) द्वारे ३.(किंवा पोटकलम (३) द्वारे) आवश्यक केल्याप्रमाणे, त्यासाठी विनिर्दिष्ट केलेल्या वेळेच्या आत, संपत्ती हस्तांतरित करण्यात कसूर करील तर ती व्यक्ती, सहा महिन्यापेक्षा कमी नाही परंतु दोन वर्षापर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या शिक्षेस किंवा ४.(पाच हजार रुपयांपेक्षा कमी नाही परंतु दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या) द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.
३) जेथे पोटकलम (१) खाली कोणत्याही संपत्तीस हक्कदार असलेली स्त्री संपत्ती मिळण्यापूर्वी मृत्यू पावेल तेथे, त्या स्त्रीचे वारस ती संपत्ती त्या त्या काळी धारण करत असलेल्या व्यक्तीकडून मागण्यास हक्कदार असतील :
५.(परंतु जेव्हा अशी स्त्री तिच्या विवाहापासून सात वर्षांच्या आत, नैसर्गिक कारणाहून अन्य कारणामुळे मृत्यू पावेल, त्याबाबतीत, अशी संपत्ती,
(a)क)(अ) जर तिला अपत्ये नसतील, तर तिच्या पालकांकडे हस्तांतरित होईल, किंवा
(b)ख)(ब) जर तिला अपत्ये असतील, तर अशा अपत्यांकडे हस्तांतरित होईल, किंवा
हस्तांतरण होईपर्यंत अशा अपत्यांसाठी ती न्यास म्हणून धारण करता येईल.)
१.(३क (अ)) पोटकलम (१) ७.(किंवा पोटकलम (३)) अन्यये आवश्यक असल्याप्रमाणे कोणतीही संपत्ती हस्तांतरित करण्यात कसूर केल्याबद्दल दोषी ठरविलेल्या व्यक्तीने, पोटकलम (२) खाली तिला दोषी ठरविण्यापूर्वी, त्या संपत्तीस हक्कदार असलेल्या स्त्रीला किंवा तिच्या ८.(वारसाला किंवा पालकांना किंवा मुलांना) अशा संपत्तीचे हस्तांतरण केले नसेल त्याबाबतीत, न्यायालय, त्या कलमाखाली शिक्षा देण्याशिवाय आणखी, लेखी आदेशाद्वारे असा निदेश देईल की, अशी व्यक्ती त्या आदेशात विनिर्दिेट करण्यात येईल अशा वेळेच्या आत, अशा स्त्रीकडे किंवा, यथास्थिति, तिच्या ८.(वारसाकडे किंवा पालकांकडे मुलांकडे) किंवा संपत्ती हस्तांतरित करील आणि अशारीतीने विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत आदेशांचे पालन करण्यात ती व्यक्ती कसूर करील तर त्या संपत्तीच्या मूल्याएवढी रक्कम, अशा न्यायालयाने जणू काही द्रव्यदंड लादला असल्याप्रमाणे, वसूल करण्यात यावी आणि ती अशा स्त्रीला किंवा, यथास्थिति तिच्या ८.(वारसांना किंवा पालकांना किंवा मुलांना) ती देण्यात यावी.
४) या कलमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट कलम ३ किंवा कलम ४ च्या उपबंधावर परिणाम करणार नाही.
——–
१. १९८४ चा अधिनियम क्रमांक ६३ याच्या कलम ५ द्वारे (२-१०-१९८५ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९८४ चा अधिनियम क्रमांक ६३ याच्या कलम ५ द्वारे पोटकलम (२) ऐवजी (२-१०-१९८५ पासून) समाविष्ट करण्यात आले.
३. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
४. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
५. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५ द्वारे परंतुक (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
६. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५ द्वारे किंवा पोटकल (३) हा मजकुर (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आला.
७. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.