Dpa 1961 कलम ४क(अ) : १.(जाहिरातींवर बंदी :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम ४क(अ) :
१.(जाहिरातींवर बंदी :
कोणतीही व्यक्ती, –
(a)क)(अ) आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा इतर नातेवाईकांच्या विवाहाच्या प्रीत्यर्थ कोणत्याही एखाद्या वृत्तपत्रात, नियतकालिकात, कालिकात कोणत्याही जाहिरातीद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आपल्या संपत्तीमधील हिस्सा किंवा पैशाचा कोणताही भाग किंवा दोन्हीही धंद्यातील किंवा इतर हितसंबंधातील हिस्सा म्हणून देऊ करील.
(b)ख)(ब) खंड (क(अ)) मध्ये निर्देशिलेली कोणतीही जाहिरात मुद्रित करील, प्रकाशित करील किंवा प्रस्तुत करील तर,
ती, सहा महिन्यांपेक्षा कमी नाही परंतु पाच वर्षांपर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा पंधरा हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल :
परंतु, न्यायालय, न्यायनिर्णयात पुरेशी व विशेष कारणे नमूद करुन, सहा महिन्यांपेक्षा कमी इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा ठोठावू शकेल.)
——–
१. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ४ द्वारे (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply