Dpa 1961 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
( १९६१ चा अधिनियम क्रमांक २८)
प्रस्तावना :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
हुंडा देण्यास किंवा घेण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम, भारतीय गणराज्याच्या बाराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो : –
———
१) या अधिनियमास हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ असे म्हणता येईल.
२) १.(***) संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार आहे.
३) केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा २.(दिनांकास) तो अंमलात येईल.
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ९५ व अनुसूची ५ द्वारा जम्मू व काश्मीर राज्य खेरीज करुन हा मजकुर (३१-१०-२०१९ पासून) वगळण्यात आले.
२. १ जुलै १०६१ अधिसूचना क्र. एस. ओ. १४१०, दिनांक २० जून १९६१, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग दोन, कलम ३(२) – पृष्ठ १००५ पहा.

Leave a Reply