सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ६ :
अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस आणि विशिष्ट क्षेत्रात सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांची विक्री करण्यास प्रतिबंध :
कोणतीही व्यक्ती, –
(a)(क) अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची असेल अशा कोणत्याही व्यक्तीला, आणि
(b)(ख) कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या सभोवताली शंभर यार्ड त्रिज्येच्या आत येणाऱ्या क्षेत्रात,
सिगारेट किंवा कोणतेही इतर तंबाखू उत्पादन विकणार नाही, विक्रीसाठी देऊ करणार नाही किंवा विकण्यास परवानगी देणार नाही.