सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ३२ :
निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांना हा अधिनियम लागू नसणे :
निर्यात केल्या जाणाऱ्या सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादने यांना किंवा सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांना या अधिनियमात अंतर्भूत असलेली कोणतीही बाब लागू होणार नाही :
परंतु, या कलमातील कोणत्याही गोष्टींमुळे, वैधानिक इशारा आणि निकोटीन व टारचे घटक नमूद न केलेल्या सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांची कोणत्याही देशात निर्यात करण्यास, त्या त्या वेळी त्या देशात अंमलात असलेल्या कायद्यानुसार, तोच किंवा तशाच स्वरूपाचा वैधानिक इशारा आणि सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांवर निकोटीन आणि टारचे घटक नमूद करणे आवश्यक असेल तर, प्राधिकार प्राप्त होतो असे मानण्यात येणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, कोणत्याही सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या किंवा सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांच्या निर्यातीसाठी जर आवश्यक ती उपाययोजना आधीच करण्यात आली असेल तर, प्रत्यक्ष निर्यात जरी केली नसली तरीही, त्यांची निर्यात या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी केली असल्याचे मानण्यात येईल.