Cotpa कलम ३० : अनुसूचीमध्ये कोणत्याही तंबाखू उत्पादनांची भर घालण्याचा अधिकार :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ३० :
अनुसूचीमध्ये कोणत्याही तंबाखू उत्पादनांची भर घालण्याचा अधिकार :
केंद्र सरकारला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे तीन महिन्यांपेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची आपल्या तसे करण्याच्या हेतूची नोटीस दिल्यानंतर तत्सम अधिसूचनेद्वारे इतर ज्या कोणत्याही तंबाखू उत्पादनाची जाहिरात त्याच्या मते प्रतिबंधित करणे आवश्यक असेल आणि त्याचे उत्पादन, पुरवठा व वितरण या अधिनियमान्वये विनियमित करणे आवश्यक असेल त्या उत्पादनाची अनुसूचीत भर घालता येईल आणि त्यानंतर ती अनुसूची अशा उत्पादनांना लागू करताना तद्नुसार सुधारण्यात आल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply