सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २८ :
अपराध आपसात मिटविणे :
(१) कलम ४ किंवा कलम ६ खाली केलेला कोणताही अपराध, केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा अपराधाबाबत खटला दाखल करण्यापूर्वी किंवा दाखल केल्यानंतर, आणि दोनशे रूपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या मोबदल्यात आपसात मिटवता येईल.
(२) जेव्हा एखादा अपराध पोटकलम (१) अन्वये आपसात मिटवण्यात आला असेल तेव्हा, अपराधी जल अभिरक्षेत असेल तर त्याला सोडून देण्यात येईल आणि त्यांच्याविरूद्ध अशा अपराधाबाबत पुढील कार्यवाही केली जाणार नाही.