Cotpa कलम २२ : सिगारेट व तंबाखू उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल शिक्षा :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २२ :
सिगारेट व तंबाखू उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, कलम ५ च्या तरतुदींचे उल्लंघन करील तो, दोष सिद्ध झाल्यानंतर पुढील शिक्षांस पात्र ठरेल –
(a)(क) पहिल्या वेळी दोष सिद्ध झाल्यावर दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल, आणि
(b)(ख) दुसऱ्या वेळी किंवा त्यानंतरच्या प्रत्येक वेळी दोष सिद्ध झाल्यावर पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र ठरेल.

Leave a Reply