सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २१ :
विवक्षित ठिकाणी धूम्रपान जाहिरात केल्याबद्दल शिक्षा :
(१) जो कोणी, कलम ४ च्या तरतुदींचे उल्लंघन करील तो दोनशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र ठरेल.
(२) या कलमाखालील अपराध हा आपसात मिटवण्याजोगा असेल आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७३ चा २) यामध्ये संक्षिप्त न्यायचौकशीसाठी तरतूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार त्याची संक्षिप्त न्यायचौकशी करण्यात येईल.