Cotpa कलम २० : वैधानिक इशारा आणि निकोटीन व टारचे घटक नमूद करण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३
कलम २० :
वैधानिक इशारा आणि निकोटीन व टारचे घटक नमूद करण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा :
(१) जी व्यक्ती पुडक्यावर किंवा लेबलवर वैधानिक इशारा आणि निकोटिन व टारचे घटक नमूद न केलेल्या सिगारेटची किंवा तंबाखू उत्पादनांचे उत्पादन किंवा निर्मिती करील ती पहिल्या वेळी दोष सिद्ध झाल्यावर दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल, आणि दुसऱ्या वेळी किंवा त्यानंतरच्या प्रत्येक वेळी दोष सिद्ध झाल्यावर पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि दहा हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र ठरेल.
(२) जी व्यक्ती पुडक्यावर किंवा लेबलवर वैधानिक इशारा आणि निकोटिन व टारचे घटक नमूद न केलेल्या सिगारेटची किंवा तंबाखू उत्पादनांची विक्री किंवा वितरण करील ती पहिल्यावेळी दोष सिद्ध झाल्यावर एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल, आणि दुसऱ्या वेळी किंवा त्यानंतरच्या प्रत्येक वेळी दोष सिद्ध झाल्यावर दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि तीन हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास पात्र ठरेल.

Leave a Reply