सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३
कलम १७ :
अभिनिर्णय :
सिगारेट किंवा कोणतेही इतर तंबाखू उत्पादनांची जप्ती करण्याबाबतचा अभिनिर्णय किंवा किंमत चुकती करण्याबाबतचा आदेश हा, –
(a)(क) ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांच्या आत असे जप्ती करण्याचे प्रकरण घडून आले असेल किंवा रक्कम चुकती करण्याचा आदेश दिला असेल त्या मूळ अधिकारिता असलेल्या प्रमुख दिवाणी न्यायालयाकडून कोणत्याही मर्यादेखेरीज दिला जाईल;
(b)(ख) केंद्र सरकार, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे याबाबत प्राधिकृत करील अशा पाच हजार रूपयांपेक्षा अधिक आर्थिक अधिकारिता असलेल्या दिवाणी न्यायालयापेक्षा खालचे नसेल अशा अन्य न्यायालयाकडून, त्याबाबत केंद्र सरकारद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा मर्यादांना अधीन राहून दिला जाईल.