Cotpa कलम १३ : ताब्यात घेण्याचा अधिकार :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम १३ :
ताब्यात घेण्याचा अधिकार :
(१) उप निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या, पोलीस उप निरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसेल अशा समतुल्य पदवरील कोणत्याही अन्य अधिकाऱ्याला जर, –
(a)(क) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या कोणत्याही पुडक्याच्या संबंधात, किंवा
(b)(ख) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या कोणत्याही जाहिरातीच्या संबंधात,
या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले आहे किंवा करण्यात येत आहे असे वाटण्यास कारण असेल तर, त्याला विहित रीतीने असे पुडके किंवा जाहिरातीचे साहित्य ताब्यात घेता येईल.
(२) पोट-कलम (१) च्या खंड (क) अन्वये ताब्यात घेतलेले सिगारेटचे किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांचे पुडके किंवा जाहिरातीचे साहित्य हे, ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांच्या आत असे सक्तीने ताब्यात घेतले होते अशा जिल्हा न्यायाधीशांची मान्यता, पुडके आणि साहित्य ठेवून घेण्यासाठी मिळविण्यात आलेली नसेल तर, ज्याने असे पुडके किंवा जाहिरातीचे साहित्य ताब्यात घेतले आहे त्या अधिकाऱ्याला साहित्य ताब्यात घेतल्याच्या तारखेपासून नव्वद दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ठेवून घेता येणार नाही.

Leave a Reply