Cotpa कलम १२ : प्रवेश करण्याचा आणि झडती घेण्याचा अधिकार :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम १२ :
प्रवेश करण्याचा आणि झडती घेण्याचा अधिकार :
(१) उप निरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी किंवा राज्य अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला, पोलीस उप निरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेले असे समतुल्य पद धारण करणारा कोणताही अन्य अधिकारी, याला जर, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झालेले आहे किंवा होत आहे याबाबत संशय घेण्यास कोणतेही कारण असेल तर, त्याला, –
(a)(क) जेथे सिगारेटचा किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांचा कोणताही व्यापार किंवा वाणिज्यव्यवहार चालू आहे किंवा जेथे सिगारेटचे किंवा कोणतेही इतर तंबाखू उत्पादनांचे उत्पादन, पुरवठा किंवा वितरण करण्यात येते आहे; किंवा
(b)(ख) जेथे सिगारेटची किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांची कोणतीही जाहिरात करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येत आहे; १.(किंवा
(c)(ग) जिथे कोणताही हुक्का बार चालविण्यात येत आहे;)
असा कोणताही कारखाना, इमारत, धंद्याचे ठिकाण किंवा अन्य कोणतेही ठिकाण यांमध्ये कोणत्याही वाजवी वेळेत, विहित केलेल्या रीतीने प्रवेश करता येईल आणि झडती घेता येईल.
(२) या अधिनियमान्वये घेतलेल्या प्रत्येक झडतीस आणि केलेल्या जप्तीस, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या तरतुदी लागू असतील.
———
१. २०१८ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक ६० याच्या कलम ४ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply