Constitution अनुच्छेद ९८ : संसदेचे सचिवालय :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ९८ :
संसदेचे सचिवालय :
(१) संसदेच्या प्रत्येक सभागृहाला, स्वतंत्र सचिवालयीन कर्मचारीवर्ग असेल :
परंतु असे की, संसदेच्या दोन्ही सभागृहांना सामाईक अशा पदांची निर्मिती करण्यास या खंडातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होतो, असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही.
(२) संसदेला, कायद्याद्वारे संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सचिवालयीन कर्मचारीवर्गात करावयाची भरती व त्यात नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सेवाशर्ती यांचे विनियमन करता येईल.
(३) खडं (२) अन्वये संसद तरतूद करीपर्यंत, राष्ट्रपतीस, लोकसभेचा अध्यक्ष, किंवा यथास्थिति, राज्यसभेचा सभापती यांच्याशी विचारविनिमय करून, लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या सचिवालयीन कर्मचारीवर्गात करावायाची भरती व त्यात नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सेवाशर्ती यांचे विनियमन करणारे नियम करता येतील आणि याप्रमाणे केलेले कोणतेही नियम, उक्त खंडान्वये केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून प्रभावी असतील.

Leave a Reply