Constitution अनुच्छेद ९७ : सभापती व उपसभापती आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ९७ :
सभापती व उपसभापती आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते :
राज्यसभेचा सभापती व उपसभापती यांना आणि लाके सभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना प्रत्येकी, संसद कायद्याद्वारे निश्चित करील असे वेतन व भत्ते देण्यात येतील आणि त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद करण्यात येईपर्यंत, दुसऱ्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले वेतन व भत्ते देण्यात येतील.

Leave a Reply