Constitution अनुच्छेद ९५ : उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांच्या अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ९५ :
उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांच्या अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार :
(१) अध्यक्षाचे पद रिक्त असताना, त्या पदाची कर्तव्ये उपाध्यक्ष किंवा, उपाध्यक्षाचे पदही रिक्त असेल तर, त्या प्रयोजनाकरता राष्ट्रपती नियुक्त करील असा लोकसभेचा सदस्य पार पाडील.
(२) लोकसभेच्या कोणत्याही बैठकीत अध्यक्ष अनुपस्थित असताना उपाध्यक्ष किंवा, तोही अनुपस्थित असल्यास, लोकसभेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे ठरवण्यात येईल अशी व्यक्ती, किंवा अशी व्यक्ती उपस्थित नसल्यास, लोकसभा ठरवील अशी अन्य व्यक्ती, अध्यक्ष म्हणून कार्य करील.

Leave a Reply