Constitution अनुच्छेद ९४ : अध्यक्षपद व उपाध्यक्षपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ९४ :
अध्यक्षपद व उपाध्यक्षपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे :
लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणाऱ्या सदस्यास——
(क) त्याचे लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर, आपले पद रिक्त करावे लागेल ;
(ख) असा सदस्य हा अध्यक्ष असल्यास, उपाध्यक्षास आणि असा सदस्य हा उपाध्यक्ष असल्यास, अध्यक्षास संबोधून, कोणत्याही
वेळी आपल्या पदाचा आपल्या सहीनिशी लेखी राजीनामा देता येईल ; आणि
(ग) लाके सभेच्या त्या वेळेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या, लाके सभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरून दूर करता येईल :
परंतु असे की, खंड (ग) च्या प्रयोजनार्थ असलेला कोणताही ठराव , तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यातआल्याखेरीज, मांडला जाणार नाही :
परंतु आणखी असे की, लोकसभा विसर्जित होईल त्या त्या वेळी, विसर्जनानंतर होणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या सभेच्या लगतपूर्वीपर्यंत अध्यक्षाला आपले पद रिक्त करता येणार नाही.

Leave a Reply