Constitution अनुच्छेद ९२ : सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ९२ :
सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे :
(१) राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत, उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना सभापती, अथवा उपसभापतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना उपसभापती, उपस्थित असूनही, अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही आणि अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात अनुच्छेद ९१ च्या खंड (२) च्या तरतुदी, जशा त्या सभापती किंवा, यथास्थिति, उपसभापती अनुपस्थित असलेल्या बैठकीच्या संबंधात लागू होतात, तशाच लागू होतील.
(२) उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव राज्यसभेत विचाराधीन असताना, त्या बाबतीत सभापतीस राज्यसभेमध्ये भाषण करण्याचा आणि तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा हक्क असेल, पण, अनुच्छेद १०० मध्ये काहीही असले तरी, असे कामकाज चालू असताना, अशा ठरावावर किंवा अन्य कोणत्याही बाबीवर मतदान करण्याचा त्याला मुळीच हक्क असणार नाही.

Leave a Reply