भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ८ :
मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :
अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजा–आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५ (मूळात अधिनियमित केल्याप्रमाणे) यात व्याख्या केलेल्या भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यत: निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती, जर तिने त्या त्या काळी ज्या देशात ती राहात असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीकडे, डोमिनिअन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी वा नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरुन अशा राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर, भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल.