भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ८८ :
मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहांबाबत हक्क :
प्रत्येक मंत्र्यास व भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहांच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या अनुच्छेदाच्या आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.