Constitution अनुच्छेद ८५ : संसदेची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ८५ :
१.(संसदेची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन :
(१) राष्ट्रपती, त्यास योग्य वाटेल अशा वेळी व ठिकाणी, अधिवेशनासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहास वेळोवेळी अभिनिमंत्रित करील, पण त्याची एका सत्रातील अंतिम बैठक व पुढील सत्रातील त्याच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेला दिनांक यांच्या दरम्यान, सहा महिन्यांपेक्षा अधिक अंतर असणार नाही.
(२) राष्ट्रपतीला, वेळोवेळी
(क) सभागृहांची किंवा त्यांपैकी कोणत्याही सभागृहाची सत्रसमाप्ती करता येईल ;
(ख) लोकसभा विसर्जित करता येईल.)
————–
१.संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९५१ याच्या कलम ६ द्वारे मूळ अनुच्छेद ८५ याऐवजी दाखल केला.

Leave a Reply