Constitution अनुच्छेद ८४ : संसदेच्या सदस्यत्वाकरता अर्हता :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ८४ :
संसदेच्या सदस्यत्वाकरता अर्हता :
एखादी व्यक्ती,
१.((क) ती भारताची नागरिक असल्याखेरीज आणि निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर, त्या प्रयोजनाकरता तिसऱ्या अनुसूचीत दिलेल्या नमुन्यानुसार तिने शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही केलेली असल्याखेरीज 😉
(ख) राज्यसभेतील जागेच्या बाबतीत, ती किमान तीस वर्षे वयाची आणि लोकसभेतील जागेच्या बाबतीत, ती किमान पंचवीस वर्षे वयाची असल्याखेरीज ; आणि
(ग) संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये त्यासंबंधात विहित केल्या जातील अशा इतर अर्हता तिच्या ठायी असल्याखेरीज, संसदेमधील जागा भरण्याकरता होणाऱ्या निवडणुकीस पात्र होणार नाही.
—————
१.संविधान (सोळावी सुधारणा) अधिनियम, १९६३ याच्या कलम ३ द्वारे खंड (क) याऐवजी दाखल केला.

Leave a Reply