Constitution अनुच्छेद ७६ : भारताचा महान्यायवादी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
भारताचा महान्यायवादी
अनुच्छेद ७६ :
भारताचा महान्यायवादी :
(१) राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अहर्ताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस भारताचा महान्यायवादी म्हणून नियुक्त करील.
(२) राष्ट्रपतींकडून महान्यायवादीकडे वेळोवेळी निर्देशिल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे करणे आणि या संविधानाद्वारे किंवा त्याअन्वये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये त्याच्याकडे सोपवण्यात आलेली कार्ये पार पाडणे, हे त्याचे कर्तव्य असेल.
(३) आपली कर्तव्ये पार पाडताना, महान्यायवादीस भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा हक्क असेल.
(४) महान्यायवादी, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करील आणि त्यास, राष्ट्रपती निर्धारित करील असे पारिश्रमिक मिळेल.

Leave a Reply