Constitution अनुच्छेद ६ : पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ६ :
पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क :
अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती, आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती, जर,–
(क) तिचा अथवा तिच्या मातापित्यांपैकी किंवा तिच्या आजा-आजींंपैकी कोणाही एकाचा गव्हर्नमेंट आफॅ इंडिया अ‍ॅक्ट, १९३५ (मूळात अधिनियमित केल्याप्रमाणे) यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल तर ; आणि
(ख) (एक) अशा व्यक्तीने १९ जुलै १९४८ या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्याबाबतीत, आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यत: निवासी असेल तर ; किंवा
(दोन) अशा व्यक्तीने १९ जुलै १९४८ या दिवशी किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्याबाबतीत, तिने नागरिकत्वासाठी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणीसंबंधात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे, त्या सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी केलेल्या अर्जावरून, अशा अधिकाऱ्याने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर,
या संविधानाच्या प्रारंभी भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल :
परंतु असे की,कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी निदान सहा महिने भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असल्याशिवाय तिची याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही.

Leave a Reply