भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ६९ :
उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :
प्रत्येक उपराष्ट्रपती, आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या किंवा त्याने त्यासंबंधात नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील, ती म्हणजे अशी–
मी, क.ख. —- ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो —- मी कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि आता जे कर्तव्य मी अंगीकारणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडीन.