Constitution अनुच्छेद ६७ : उपराष्ट्रपतीचा पदावधी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ६७ :
उपराष्ट्रपतीचा पदावधी :
उपराष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील :
परंतु असे की,—-
(क) उपराष्ट्रपती राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल ;
(ख) राज्यसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि लोकसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करता येईल; परंतु या खंडाच्या प्रयोजनार्थ, कोणताही ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज तो मांडला जाणार नाही ;
(ग) उपराष्ट्रपती, आपला पदावधी संपला असला तरीही, त्याचा उत्तराधिकारी त्याचे पद ग्रहण करीपर्यंत आपले पद धारण करणे चालू ठेवील.

Leave a Reply