Constitution अनुच्छेद ६४ : उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ६४ :
उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे :
उपराष्ट्रपती हा, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व तो कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही :
परंतु असे की, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद ६५ अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करील किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडील तेव्हा, अशा कोणत्याही कालावधीत तो राज्यसभेच्या सभापतीपदाची कर्तव्ये पार पाडणार नाही आणि राज्यसभेच्या सभापतीला अनुच्छेद ९७ अन्वये प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ता मिळण्यास हक्कदार असणार नाही.

Leave a Reply