भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग दोन
नागरिकत्व
अनुच्छेद ५ :
संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व :
या संविधानाच्या प्रारंभी, भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि–
(क) जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती ; किंवा
(ख) जिच्या मातापित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते ; किंवा
(ग) जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान पाच वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यत: निवासी आहे,
अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल.