भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ५१ :
आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन :
राज्य हे,—-
(क) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी ;
(ख) राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ;
(ग) संघटित जनसमाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची आबंधने याबद्दल आदरभावना
जोपासण्यासाठी ; आणि
(घ) आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी,
प्रयत्नशील राहील.