Constitution अनुच्छेद ४५ : सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरिता तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ४५ :
१.(सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरिता तरतूद :
राज्य, सर्व बालकांसाठी, त्यांच्या वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत, प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांसाठी तरतूद करण्याकरिता प्रयत्न करील.)
————-
१.संविधान (शहाऐशींवी सुधारणा) अधिनियम, २००२ याच्या कलम ३ द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केला (१ एप्रिल २०१० रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply