भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३९ :
राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे :
राज्य हे, विशेषत: पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखील,——
(क) उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा ;
(ख) सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी व्हावी ;
(ग) आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संचय सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये ;
(घ) पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे ;
(ङ) स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरूपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये ;
१.((च) बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्याबाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे.)
——————–
१.संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम ७ द्वारे मूळ खंड (च) ऐवजी दाखल केला (दिनांक ३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).