Constitution अनुच्छेद ३८ : राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३८ :
राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे :
१.((१)) राज्य, त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
२.((२) राज्य हे, विशेषत: केवळ व्यक्ती-व्यक्तींमध्येच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या किंवा निरनिराळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसमूहांमध्ये देखील, उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करील आणि दर्जा, सुविधा व संधी यांच्याबाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील.)
————–
१.संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ९ द्वारे अनुच्छेद ३८ याला त्याचा खंड (१) असा नवीन क्रमांक दिला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).
२.वरील अधिनियमाच्या कलम ९ द्वारे खंड़ (२) समाविष्ट केला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply