भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३७८-क :
१.(आंध्र प्रदेश विधानसभेच्या कालावधीसंबंधी विशेष तरतूद :
अनुच्छेद १७२ मध्ये काहीही असले, तरी, राज्य पुनर्रचना अधिनियम, १९५६ याची कलमे २८ व २९ यांच्या तरतुदींअन्वये घटित केलेली अशी आंध्र प्रदेश राज्याची विधानसभा, उक्त कलम २९ मध्ये निर्देशिलेल्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत –तत्पूर्वी ती विसर्जित न झाल्यास—चालू राहील, मात्र त्याहून अधिक काळ नाही आणि उक्त कालावधी समाप्त झाला की ती विधानसभा विसर्जित होईल.)
———
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २४ द्वारे समाविष्ट केला.