Constitution अनुच्छेद ३७१ख : आसाम राज्याबाबत विशेष तरतूद :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३७१-ख :
१.(आसाम राज्याबाबत विशेष तरतूद :
या संविधानात काहीही असले तरी राष्ट्रपतीला, आसाम राज्याबाबत काढलेल्या आदेशाद्वारे सहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद २० ला जोडलेल्या तक्त्यातील २.(भाग एक) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जनजाति-क्षेत्रांतून निवडून आलेले त्या राज्याच्या विधानसभेचे सदस्य आणि त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल त्या संख्येइतके त्या विधानसभेचे अन्य सदस्य मिळून बनलेली, त्या विधानसभेची समिती घटित करण्याकरिता व तिची कार्ये यांकरिता आणि अशी समिती घटित करण्यासाठी व तिचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी त्या विधानसभेच्या कार्यपद्धति-नियमांत फेरबदल करण्याकरता तरतूद करता येईल.)
———-
१. संविधान (बाविसावी सुधारणा) अधिनियम, १९६९ याच्या कलम ४ द्वारे समाविष्ट केला.
२.ईशन्य क्षेत्रे (पुनर्रचना) अधिनियम, १९७१ (१९७१ चा ८१) याच्या कलम ७१ द्वारे भाग क या मजकुराऐवजी दाखल (२१ जानेवारी १९७२ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply