भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३५५ :
परचक्र व अंतर्गत अशांतता यांपासून राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे कर्तव्य :
परचक्र व अंतर्गत अशांतता यांच्यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवले जाईल याची सुनिश्चिती करणे, हे संघराज्याचे कर्तव्य असेल.