Constitution अनुच्छेद ३५४ : आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलांच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३५४ :
आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलांच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे :
(१) आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना, राष्ट्रपतीला, आदेशाद्वारे, अऩुच्छेद २६८ ते २७९ यांच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही तरतुदी, त्यास योग्य वाटतील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह, आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीपर्यंत अंमलात असतील असे निदेशित करता येईल, मात्र कोणत्याही परिस्थितीत ज्या वित्तीय वर्षांत अशी उद्घोषणा अंमलात असण्याचे बंद होणार असेल, त्या वर्षाच्या समाप्तीपलीकडे तो कालावधी वाढणार नाही.
(२) खंड (१) अन्वये केलेला प्रत्येक आदेश, तो केल्यानंतर होईल तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवला जाईल.

Leave a Reply