Constitution अनुच्छेद ३५१ : हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेश :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३५१ :
हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेश :
हिंदी भाषेच्या प्रसारास चालना देणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात येईल अशा रीतीने तिचा विकास करणे, तिच्या प्रकृतीला धक्का न लावता, हिंदुस्थानी व आठव्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या अन्य भारतीय भाषा यामध्ये वापरली जाणारी रुपे, शैली व शब्दप्रयोग सामावून घेऊन आणि जेथे जेथे आवश्यक वा इष्ट असेल तेथे तेथे तिच्या शब्दसंग्रहाकरता मुख्यत: संस्कृतचा व गौणत: अन्य भाषांचा अवलंब करुन तिची समृद्धी साधणे हे संघराज्याचे कर्तव्य असेल.

Leave a Reply