Constitution अनुच्छेद ३५०ख : भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३५०-ख :
१.(भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी :
(१) भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता एक विशेष अधिकारी असेल व तो राष्ट्रपतीने नियुक्त करावयाचा असेल.
(२) भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता या संविधानाअन्वये तरतूद केलेल्या संरक्षक उपाययोजनांसंबंधीच्या सर्व बाबींचे अन्वेषण करणे व राष्ट्रपती निदेश देईल अशा नियत कालांतरागणिक त्या बाबींसंबंधी राष्ट्रपतीला अहवाल देणे, हे विशेष अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल आणि राष्ट्रपती, असे सर्व अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची आणि संबंधित राज्यांच्या शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करील.)
———–
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २१ द्वारे समाविष्ट केला.

Leave a Reply