भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३४६ :
राज्या-राज्यांमधील अथवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा :
संघराज्यात शासकीय प्रयोजनांकरता वापरण्यासाठी त्या त्या वेळी प्राधिकृत झालेली भाषा ही, राज्या-राज्यांमधील आणि एखादे राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा असेल :
परंतु असे की, जर दोन किंवा अधिक राज्यांनी, हिंदी भाषा ही अशा राज्यांमधील व्यवहाराची राजभाषा असावी, असे एकमताने ठरविले तर, ती भाषा अशा व्यवहारासाठी वापरता येईल.