भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग सतरा :
राजभाषा :
प्रकरण एक :
संघराज्याची भाषा :
अनुच्छेद ३४३ :
संघराज्याची राजभाषा :
(१) संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल. संघराज्याच्या शासकीय प्रयोजनांसाठी वापरावयाच्या अंकांचे रूप हे भारतीय अंकांचे आंतरराष्ट्रीय रूप असेल.
(२) खंड (१) मध्ये काहीही अंतर्भूत असेल तरी, या संविधानाच्या प्रारंभापासून पंधरा वर्षांच्या कालावधीपर्यंत, संघराज्याच्या ज्या शासकीय प्रयोजनासाठी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी इंग्रजी भाषा वापरली जात होती, त्या सर्व प्रयोजनांसाठी तिचा वापर चालू राहील :
परंतु असे की, राष्ट्रपतीला, उक्त कालावधीन १().आदेशाद्वारे, संघरज्याच्या शासकीय प्रयोजनांपैकी कोणत्याही प्रयोजनाकरता इंग्रजी भाषेच्या जोडीस हिंदी भाषेचा आणि भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय रूपाच्या जोडीस देवनागरी रूपाचा वापर प्राधिकृत करता येईल.
(३) या अनुच्छेदता काहीही अंतर्भूत असले तरी, संसदेला कायद्याद्वारे उक्त पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर त्या कायद्यात विनिर्दिष करण्यात येतील अशा प्रयोजनांसाठी—-
(क) इंग्रजी भाषेचा, किंवा
(ख) अंकांच्या देवनागरी रूपाचा, वापर करण्याकरता तरतूद करता येईल.
————
१. पहा. संविधान आदेश ४१.