भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३४० :
मागासवर्गांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती :
(१) भारताच्या राज्यक्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या स्थितीचे व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्यांचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी व त्यांची स्थिती सुधारण्यासाठक्ष संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्या, यासंबंधी आणि त्या प्रयोजनाकरता संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणती अनुदाने द्यावीत व कोणत्या शर्तींना अधीन राहून अशी अनुदाने द्यावीत, यासंबंधी शिफारशी करणे याकरता राष्ट्रपतीला, त्यास योग्य वाटतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला आयोग, आदेशाद्वारे नियुक्त करता येईल, आणि असा आयोग नियुक्त करणाऱ्या आदेशाद्वारे, आयोगाने अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.
(२) याप्रमाणे नियुक्त केलेला आयोग, त्याच्याकडे निर्देशिलेल्या बाबींचे अन्वेषण करील, आणि त्यास आढळून येईल अशी वस्तुस्थिती मांडणारा व त्याला उचित वाटतील अशा शिफारशी करणारा अहवाल राष्ट्रपतीस सादर करील.
(३) राष्ट्रपती, याप्रमाणे सादर केलेल्या अहवालाची प्रत, त्यावर केलेल्या कारवाईचे स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासहित, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करील.