भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३३१ :
लोकसभेत आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व :
अनुच्छेद ८१ मध्ये काहीही असले तरी, जर आंग्लभारतीय समाजाला लोकसभेत पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही, असे राष्ट्रपतीेचे मत असेल तर, त्याला त्या समाजाचे जास्तीत जास्त दोन सदस्य लोकसभेवर नामनिर्देशित करता येतील.