भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३२८ :
राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार :
या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून आणि संसदेने त्यासंबंधात तरतूद केली नसेल तेवढ्या मर्यादेपर्यंत, राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकांबाबत सर्व बाबींविषयी किंवा बाबींसंबंधात तसेच मतदार याद्या तयार करण्याकरता आणि असे सभागृह किंवा सभागृहे रीतसर घटित व्हावीत याकरता आवश्यक असलेल्या इतर सर्व बाबींसंबंधातही त्या राज्याच्या विधानमंडळाला वेळोवेळी कायद्याद्वारे तरतूद करता येईल.