भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३२५ :
कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही :
संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या अथवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकीकरिता प्रत्येक क्षेत्रीय मतदारसंघासाठी एक सर्वसाधारण मतदार यादी असेल आणि कोणतीही व्यक्ती केवळ धर्म, वंश, जात, लिंग या किंवा यांपैकी कोणत्याही कारणावरून अशा कोणत्याही मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही, अथवा त्या कारणास्तव तिला, अशा कोणत्याही मतदारसंघासाठी असलेल्या कोणत्याही खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही.