भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३१९ :
आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई :
पद धारण करणे समाप्त झाल्यावर–
(क) संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हा, त्यानंतर भारत सरकारच्या नियंत्रणाखाली किंवा एखाद्या राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली नोकरी करण्यास पात्र असणार नाही ;
(ख) राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हा, संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा अन्य कोणताही सदस्य म्हणून अथवा अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यास पात्र असेल, पण भारत सरकारच्या किंवा एखाद्या राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अन्य कोणत्याही नोकरीस पात्र असणार नाही ;
(ग) संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाव्यतिरिक्त अन्य सदस्य हा संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यास पात्र असेल, पण भारत सरकारच्या किंवा एखाद्या राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अन्य कोणत्याही नोकरीस पात्र असणार नाही ;
(घ) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त अन्य सदस्य हा, संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा अन्य कोणताही सदस्य म्हणून अथवा त्या किंवा अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यास पात्र असेल, पण भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या किंवा एखाद्या राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अन्य कोणत्याही नोकरीस पात्र असणार नाही.