भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३१ख :
१.(विवक्षित अधिनियमांची व विनियमांची विधिग्राह्यता :
अनुच्छेद ३१क मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींच्या व्यापकतेला बाध न येता, नवव्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्यापैकी कोणताही अधिनियम आणि विनियम अथवा त्यांच्या तरतुदीपैकी कोणतीही तरतूद ही, या भागाच्या कोणत्याही तरतुदींद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काशी विसंगत आहे अथवा त्याच्यामुळे तो हक्क हिरावला जातो किंवा त्या हक्काचा संकोच होतो या कारणावरून असा अधिनियम, विनियम किंवा तरतूद शून्यवत आहे अथवा कधी काळी शून्यवत होती असे मानले जाणार नाही आणि कोणत्याही न्यायालयाचा किंवा न्यायाधिकरणाचा कोणताही न्यायनिर्णय, हुकूमनामा किंवा आदेश विरूद्ध असला तरी, कोणत्याही सक्षम विधानमंडळास उक्त अधिनियमांपैकी आणि विनियमांपैकी प्रत्येक अधिनियम आणि विनियम निरसित करण्याचा किंवा त्यात सुधारणा करण्याचा जो अधिकार असेल, त्यास अधीन राहून त्या प्रत्येकाचा अंमल चालू राहील.)
——–
१. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९५१ याच्या कलम ५ द्वारे समाविष्ट केला.