भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग चौदा :
संघराज्य आणि राज्ये यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा :
प्रकरण एक :
सेवा :
अनुच्छेद ३०८ :
अर्थ लावणे :
या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, राज्य या १.(शब्दप्रयोगात जम्मू व काश्मीर या राज्याचा समावेश होत नाही.)
———–
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे शब्दप्रयोगाचा अर्थ, पहिल्या अनुसूचीचा भाग क किंवा भाग ख यांत उल्लेखिलेले राज्य असा आहे. या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल केला.