Constitution अनुच्छेद २९९ : संविदा :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २९९ :
संविदा :
(१) संघराज्याच्या किंवा राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर करून केलेल्या सर्व संविदा, यथास्थिति, राष्ट्रपतीकडून किंवा राज्याच्या राज्यपालाकडून १.(***) करण्यात येत असल्याचे म्हटले जाईल, आणि त्या अधिकाराचा वापर करून केलेल्या अशा सर्व संविदा व मालमत्तेची सर्व हस्तांतरणपत्रे राष्ट्रपतीच्या किंवा राज्यपालाच्या १.(*)वतीने, तो निदेशित किंवा प्राधिकृत करील अशा व्यक्तीकडून आणि अशा रीतीने निष्पादित केली जातील.
(२) या संविधानाच्या प्रयोजनार्थ किंवा याच्या पूर्वीपर्यंत अंमलात असलेल्या भारत सरकारसंबंधीच्या कोणत्याही अधिनियमितीच्या प्रयोजनार्थ केलेली किंवा निष्पादिलेली कोणतीही संविदा किंवा हस्तांतरणपत्र याबाबत, राष्ट्रपती किंवा राज्यपाल १.(***) यांपैकी कोणीही व्यक्तिश: दायी असणार नाही, तसेच त्यांच्यापैकी कोणाच्याही वतीने अशी कोणतीही संविदा किंवा हस्तांतरणपत्र करणारी किंवा निष्पादित करणारी कोणतीही व्यक्ती त्याबाबत व्यक्तिश: दायी होणार नाही.
———-
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुखांकडून/किंवा राजप्रमुखाच्या हा मजकूर गाळला.

Leave a Reply